Advertisement

मुंडे भगिनींनी घेतली गडकरींची भेट

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

बीड-भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेतली.बीड जिल्ह्यातील रस्ते वाहतूक,राष्ट्रीय महामार्ग आणि विकास कामांसंदर्भात या भेटीत चर्चा करण्यात आली.याप्रसंगी खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातील रस्त्यांविषयी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.

         जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रस्त्यांच्या समस्या, राष्ट्रीय महामार्ग आणि विकास कामांविषयी संबंधित लोकप्रतिनिधींंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.यापैकी काही विषयांसंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामहामार्गाच्या दुरुस्तीसाठी कांही दिवसांपूर्वी निधी दिला होता,तसेच पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यासंदर्भात केलेल्या ट्विट बद्दल त्यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते तसेच वेगवेगळ्या रस्ता कामांसाठी बीड जिल्हयाला भरभरून निधी दिल्याबद्दल पंकजा मुंडे, खा.प्रितम मुंडे यांनी यावेळी त्यांचे आभार मानले. बीड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांविषयी या बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील रस्ते आणि विकास कामांना प्राधान्य देऊन चर्चेसाठी मुबलक वेळ दिल्याबद्दल खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी यावेळी गडकरी यांचे आभार मानले.गेवराईचे आ.लक्ष्मण पवार, आ.नमिता मुंदडा,रमेश आडसकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement