Advertisement

केज तालुक्यात इसमाचा मृतदेह आढळला

प्रजापत्र | Wednesday, 20/10/2021
बातमी शेअर करा

केज दि.20 - तालुक्यातील दैठणा येथे विलास बबन मुळे (३८) या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील प्रकार घातपात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

           विलास बबन मुळे यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून मृत व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून येत असल्याने सदरील प्रकार हा घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

          सदर घटनेची माहिती मिळताच केजचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती पीएसआय दादासाहेब सिद्धे यांनी दिली.

Advertisement

Advertisement