Advertisement

बीड जिल्हा कोरोनामुक्तीकडे

प्रजापत्र | Sunday, 17/10/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस घटत असून रविवारी (दि.१७) नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.९९५ नमुन्यांमध्ये केवळ ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळत आहे. 
           बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग घटत असून रविवारी आष्टी ३,बीड २,केज २ आणि शिरूरमध्ये फक्त १ रुग्ण आढळून आला.इतर तालुक्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये भर पडली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement