Advertisement

अपघातात एकाचा मृत्यू

प्रजापत्र | Saturday, 16/10/2021
बातमी शेअर करा

केज दि.१६ - तालुक्यातील विडा येथे टमटम आणि मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
          तालुक्यातील येवता तांडा येथील सचिन अर्जुन राठोड अंदाजे वय 20 वर्षे हे मोटारसायकल वर दुपारी चालले असता ते विड्यातील तलावाजवळ आले असता वळणावर टमटम व मोटारसायकल चा अपघात झाला.यात सचिन राठोड यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement