Advertisement

दोन ट्रक गुटखा पकडला 

प्रजापत्र | Wednesday, 13/10/2021
बातमी शेअर करा

बीड - दि.१३ (प्रतिनिधी)- कर्नाटकहून बीडकडे दोन ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती डीवायएसपी पंकजकुमार यांना झाल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या. या गाड्यांमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई आज दुपारी मांजरसुंबा येथे करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कर्नाटक राज्यातून बीडकडे दोन ट्रक भरुन गुटखा येत असल्याची माहिती मिळताच या ट्रक मांजरसुंबा मार्गावरून जात होत्या. या दोन्ही गाड्या डीवायएसपी पंकजकुमार, नेकनूर ठाण्याचे एपीआय  शेख मुस्तफा, दीपक खांडेकर, सय्यद अब्दुल, मनोहर अनवणे, राऊत यांनी ताब्यात घेतल्या. या दोन्ही गाड्यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला दोन्ही ट्रक गुटख्यासह पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या गाड्या कर्नाटकहून बीडकडे येत होत्या. त्या ट्रक कोणाकडे येत होत्या, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या कारवाईने गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement