Advertisement

सतरा वर्षीय युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 09/10/2021
बातमी शेअर करा

केज दि.९ (वार्ताहर)– तालुक्यातील देवगाव येथे एका १७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. ओमकार मल्हारी जावळे ( वय १७ ) असे त्याचे नाव असून मागील १५ वर्षांपूर्वी त्याच्या आई – वडिलांचे निधन झाल्याने ओमकार हा देवगाव येथील लक्ष्मण रामा कांबळे या मामाकडे होता. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता ओमकार याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत संजय मारुती कांबळे यांच्या गायरान जमिनीतील लिंबाच्या झाडास निदर्शनास आला. या घटनेनंतर नांदूरघाटचे बिट जमादार गोविंद बडे, पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदूरघाटला मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. लक्ष्मण रामा कांबळे यांनी दिलेल्या खबरेवरून केज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement