Advertisement

घरात घुसून विवाहित महिलेचा विनयभंग

प्रजापत्र | Saturday, 09/10/2021
बातमी शेअर करा

माजलगाव दि.०९ (वार्ताहर )-शहरातील एका २८ वार्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून एका २१ वर्षीय तरुणाकडून विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरुवार दि.७ रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान समता कॉलनी येथे घडली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. 

 याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता कॉलनी येथील विवाहित महिला आपल्या घरात घरकाम करत होती. यावेळी रात्री नऊच्या दरम्यान मंजरथ रोडच्या बाजूला राहत असलेला प्रदीप नामदेव राठोड (वय २१) नामक तरुण सदरील महिलेच्या घरात घुसला. व त्याने वाईट हेतूने महिलेचा विनयभंग केला. शुक्रवारी महिलेच्या फिर्यादीवरून  प्रदीप नामदेव राठोड याच्याविरुद्ध भादवि कलम ४५२,३५४,५०४ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीसनाईक एस.बी. मोरे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement