बीड दि.६ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी कोरोना बळींची वाढती संख्या आरोग्य विभागासाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.बुधवारी (दि.६) कोरोनामुळे आणखी चौघांचा मृत्यु झाला.तर नवे २२ रुग्ण आढळून आले असून २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात मंगळवारी १ हजार ९७६ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी मिळाले. यात १ हजार ९५४ निगेटिव्ह तर २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १, आष्टी ६, बीड व गेवराई तालुक्यात प्रत्येकी ४, माजलगाव तालुक्यात ३ तर पाटोदा व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे.मृतांमध्ये लव्हूरी (ता.केज) येथील ७५ वर्षीय पुरुष, पाटोदा येथील ६३ वर्षीय महिला, काठवडा तांडा (ता.गेवराई) येथील ६० वर्षीय महिला व बेलुरा (ता.बीड) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण रुग्ण मृत्यूची संख्या २ हजार ७७८ इतकी झाली.तसेच बुधवारी दिवसभरात २६ जणांनी कोरोनावर मात केल्याने आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ८७० झाली आहे.
बातमी शेअर करा