बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून नव्या रुग्णाच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे.रविवारी (दि.३) सकाळी आरोग्य विभागाच्या अहवालात केवळ २२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर १९९८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १,आष्टी ८,बीड ५,गेवराई १,केज १,पाटोदा ६ रुग्ण आढळून आले.दरम्यान घटती रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. वडवणी,धारूर,माजलगाव,परळी,शिरूरमध्ये रविवारी एकही रुग्ण आढळून आला नाही.
बातमी शेअर करा