नेकनूर-येथील रिक्षा चालक मधुकर मुळे यांचा मुलगा अशोक मुळे (वय-१९) याचा मागील आठवड्यात वणगाव जवळ अपघात झाला होता.या अपघातात त्याची प्रकृती गंभीर झाली असून पुढील उपचारासाठी समाजातील दानशुरांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मुळे कुटुंबियांनी केले आहे.
अशोक मुळेच्या अपघातात डोक्याला आणि एका पायाला गंभीर मार लागला असून तो सध्या औरंगाबाद येथील लाईफ लाईन मल्टिपेशालिस्ट येथे उपचार घेत आहे.डॉक्टरांनी त्याच्यावर डोक्याच्या दोन आणि पायाची एक अशा तीन गंभीर शस्त्रक्रिया केल्या असून आणखी काही शस्त्रक्रिया बाकी आहेत. अशोकच्या घराची परिस्थिती जेमतेम असून मुळे कुटुंबियांना आर्थिक मदतीची उपचारासाठी गरज असून समाजातील दानशुरांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
मदतीसाठी श्री. मुळे यांचा बॅंक तपशील
phone pe - 7083555656
अकाऊंट नंबर - 62175718769
IFSC Code:- SBIN0020406