Advertisement

तरुणाच्या खून प्रकरणातील चार आरोपी जेरबंद

प्रजापत्र | Thursday, 30/09/2021
बातमी शेअर करा

केज : तालुक्यात चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका पारधी समाजातील युवकाचा मृत्यू झाल्याची हातनं घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चार आरोपी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अधिक माहिती अशी की, दि. 28 रोजी रात्री 12.30 वा च्या दरम्यान फिर्यादी सरवस्ती शिवाजी काळे हिन केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचा नवरा शिवाजी नामदेव काळे, भाऊ दीपक अशोक शिंदे व मावस भाऊ आकाश बापू काळे हे भोपला येथील सोयाबीन काढणीसाठी पाहणी करून आरणगाव, काळेगाव हनुमत पिंप्री मागे त्याच्या मोटार सायकल क्र. (एमएच-25/ए-2255) वरुन गावाकडे जात असताना ते उत्तरेश्वर पित्री येथे आले. त्या वेळी तेथे आरोपी उध्दव माणिक शिंदे, राजेंद्र लाला शिंदे, दिपक राजेंद्र शिंदे, फुलचंद मी पवार, विलास माणिक शिंदे य इतरांनी ट्रॅक्टर चोरीच्या संशया वस्न त्यांना धरून ठेवले त्या सर्वांनी मिळून फिर्यादीचे पती शिवाजी माणिक काळे उर्फ माखल्या यांना पहाटे 3 पर्यंत जबर मारहान करून ठार मारले. त्या नंतर प्रकरण अगलट येऊ नये म्हणून मयत शिवाजी उर्फ माखल्या आणि जखमी यांना ट्रॅक्टरने बोरगाव चौकातील रस्त्याच्या कडेला नेऊन टाकले अशी फिर्याद दिली.

 सदर फिर्यादीवरून उध्दव माणिक शिंदे राजेंद्र लाला शिंदे दिपक राजेंद्र शिंदे, फुलचंद मौट्टु पवार, विलास माणिक शिंदे व इतर यांच्या विरुद्ध गुरु 471/2021 भादवि 302, 143, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यानी यातील आरोपी उदय माणिक शिंदे राजेंद्र लाला शिंदे फुलचट मी पवार, विलास माणिक शिंदे रा हनुमत पिंप्री याना हनुमत पिंप्री येथून अटक केली असून टिपक राजेंट शिंदे हा फरार आहे. तर उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांनी दि.29 सप्टेंबर रोजी दिवसभर फेज पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पोलिसांनी तपासात इतर आरोपी निष्पन्न होताच त्यांना ताब्यात घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी गावी जाऊन नवतावर अत्यसंस्कार केले

Advertisement

Advertisement