बीड (प्रतिनिधी)- चकलांबा पोलिस ठाण्याचे एपीआय नवले व त्यांच्या टीमने दोन दिवसात गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या टिप्परसह जेसीबी वर कारवाई करत १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई तालुक्यातील मौजे बोरगाव आणि सुरळेगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रक क्रमांक एम. एच.१२ एचडी १९४९ आणि टिप्पर क्र. एम .एच ०४ डिके ७१४९ यासह एक जेसीबी आणि वाळू असा १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई सपोनि नवले,पोना येळे, रुईकर व इतरांनी केली.
बातमी शेअर करा