Advertisement

 बीडमध्ये पंधरा वर्षीय मुलीची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

 बीड (प्रतिनिधी)- एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी चऱ्हाटा फाटा परिसरातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथील समरीन इकबाल मनियार (वय१५) ही आज घरातून कोणालाही न सांगता गेले होती. त्यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध केली असता एका विहिरीजवळ तिची चप्पल आढळून आली. ग्रामस्थांच्या मदतीने तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement