Advertisement

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यापासुन आ.सोळंके दूर?

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्यापासून बीड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते माजलगाव मतदारसंघात बैठक घेणार आहेत. मात्र आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हेच या दौऱ्यात उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. आ. प्रकाश सोळंकेंच्या फेसबुक पेजवरुन  'मी अपरिहार्य कारणामुळे दौऱ्यात पोहचू शकत नाही, कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे' अशी पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आता वेगळयाच चर्चा सुरु झाल्या आहेत.

 

 


 

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्वस्थता लपून राहिलेली नाही. विशेषतः माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांच्या ज्येष्ठतेची पक्षात फारशी किंमत केली जात नसल्याचे सातत्याने त्यांचे कार्यकर्ते बोलत असतात. या पार्श्वभूमीवर आता उद्याच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यापासुन आ. सोळंके दुर राहणार असल्याची माहिती आहे. 
अपरिहार्य कारणांमुळे आपण या दौऱ्याला पोहचू शकत नाही. त्यामुळे आजचा कार्यक्रम पुढे ढलण्यात येत आहे अशी पोस्ट आ. सोळंकेंच्या फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे. त्यामुळे आ. प्रकाश सोळंकेंच चाललय तरी काय हा प्रश्न निर्माण होत आहे.

 

Advertisement

Advertisement