केज दि.२५ - अगोदरच अतिवृष्टीने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असताना तालुक्यातील पिसेगाव येथिल शेतकऱ्यावर नवीनच संकट ओढवले असून काढून ठेवलेल्या सोयाबीन च्या गंजीला आग लागून दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील पिसेगाव येथील शेतकरी लिंबराज पांडुरंग सूर्यवंशी यांनी गावाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या तीन एक्कर मधील सोयाबीन काढून गंज लावून ठेवली होती. परंतु दि.२५ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान सदरील गंज पेटली असल्याचे निदर्शनास आले.त्यामध्ये सर्वच्या सर्व सोयाबीन जळून खाक झाले असून सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान सदरील आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित शेतकऱ्याने प्रशासनाला कळवले असून पंचनामा करून नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.
बातमी शेअर करा