Advertisement

भरधाव क्रेटा ने घेतला दोघांचा बळी.......!

प्रजापत्र | Thursday, 23/09/2021
बातमी शेअर करा

 

नेकनूर दि. २३ - कामा निमित्त नेकनूर येथे आलेल्या खंडाळा येथील फौजीच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या क्रेटा गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना  मांजरसुंबा नेकनुर रस्त्यावरील रविंद्र धाब्यासमोर घडली .  उमेश अभिमान सिरसाट रा. खंडाळा वय ३७ वर्षे, विष्णु शंकर काटे , वय ४९ वर्ष रा. खंडाळा असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. उमेश अभिमान सिरसाट हे फौजी होते. सध्या ते बेळगाव कर्नाटक येथे कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून गावी आले होते. आज कामा निमित्त नेकनूर येथे आल्यानंतर काम आटोपून ते सायंकाळी त्यांच्या मित्रासह दुचाकीवर जात असतांना मांजरसुबा- नेकनुर रसत्यावरील रविंद्र धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला  क्र . एम . एच . १४ - बी.ई - ९५४२  ला समोरून येणाऱ्या क्रेटा क्र . एम.एच .१३ - सी.एस .८०६९  ने जोराची धडक़ दिली . झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांचा मित्र जागीच ठार झाला. घटनेची माहिती नेकनुर पोलिसांना मिळताच घटनास्थळी राठोड , सोनवणे , पवार , राऊत , अनवणे , मजहर भाई यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुरच्या रुग्णालया आणण्यात आले आहे.

           दरम्यान, खाजगी रुग्णवाहिका चालवणारे सलीम भाई रस्त्यावर कधीही अपघात होऊद्या कायम अर्ध्या रात्री ते हजर होऊन अपघात घडणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी ते सहकार्य करतात. त्यात पैशा पाण्याची पर्वा न करता किंवा रुग्णालयात नेल्यावर तेथे कोणी त्यांना मदत अथवा न करो सलीम भाई त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या बेड पर्यत घेऊन जातात. आजही सलीम भाई अपघात होताचा तात्काळ त्या ठिकाणी रुग्णवाहिका घेऊन हजर झाले. परंतु सदरील अपघात झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

 

Advertisement

Advertisement