Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

प्रजापत्र | Wednesday, 22/09/2021
बातमी शेअर करा

केज दि.२२ - दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री १:०० वा च्या दरम्यान केज शहरातील बीड रोडवर कानडी चौका जवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत मोटारसायकल वरील दोघे जागीच ठार झाले आहेत.

                 सुमित संदिपान शिरसाट (18) व  सुजित सुरेश राऊत (20) हे दोघे मयत झाले. अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

           दरम्यान शहरात रोडचे काम सुरू असून एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून रखडत पडलेल्या कामामुळे यापूर्वी ही अनेकदा अपघात झाले आहेत.

Advertisement

Advertisement