Advertisement

वैद्यनाथाच्या नगरीत अवतरले अष्टविनायक

प्रजापत्र | Friday, 17/09/2021
बातमी शेअर करा

परळी-प्रभू वैद्यनाथ नगरीत अष्टविनायक अवतरल्याची अनुभूती भक्तांना येत आहे. गणेशोत्सवानिमित्त परळीत अष्टविनायकाचा नयनरम्य देखावा साकारला आहे.शहरातील प्रेम पन्ना अपार्टमेंटच्या १२०० स्क्वेअर फूट मध्ये पार्किंग मध्ये हा भव्य दिव्य देखावा साकारण्यात आला आहे.प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची प्रतिकृतीही याठिकाणी साकारण्यात आली आहे.सदरील देखाव्यातील अष्टविनायक मूर्ती या माती आणि क्ले च्या साह्याने बनवण्यात आल्या आहेत.
रविवार (दि.२०) पर्यंत भाविकांना सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत हा देखावा पाहता येणार आहे.राकेश चांडक या भाविकाने या देखाव्याची निर्मिती केलेली असून कोरोना संकटकाळात चौदा विद्या चौसष्ठ कलेचा अधिपती असणारा श्री गणेशाचे आठही रूपाचे दर्शन या ठिकाणी होत आहे.या निमित्ताने परळीकरांना अष्टविनायकाच्या दर्शनाची पर्वणी एकाच जागी मिळत आहे.या हा देखावा करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असून यासाठी अपार्टमेंटच्या सर्वच नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
या देखाव्यात अष्टविनायक मूर्ती या मुख्य आकर्षण आहेतच शिवाय सायंकाळी होणाऱ्या  आरतीचे नियोजन ही विशेष आहे.या देखाव्याच्या निमित्ताने प्रेम- पन्ना अपार्टमेंटला अष्टविनायक धाम स्वरूप प्राप्त झाल्याची अनुभूती या ठिकाणी येत आहे.हा देखावा साकारण्यासाठी प्रेम पन्ना अपार्टमेंट मधील राजेन्द्र दुग्गड़ ,राजेश झंवर,संजय गोडसे,रामराव जाधव श्रीरंग भाग्यवन्त,रमेश घोड़के,राहुल राका,विकास झा,पुष्पांक चौबे आदींसह प्रेम पन्ना कॉलनीतील रहिवासी गेले दोन महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत.

 

आठही गणेशाच्या दर्शनाचे भाग्य
आरतीसाठी उपस्थित असलेले भाविकाकडून आठही गणेश मूर्तींची साखळी आरतीचे नियोजन आयोजकांनी केले आहे.जय गणेश देवा या आरतीच्या प्रत्येक कडव्या बरोबर भाविकांना प्रदक्षिणा सहित आठही गणेशांची आरती करण्याचे भाग्य भाविकांना या ठिकाणी मिळत आहे.

Advertisement

Advertisement