अशोक शिंदे
नेकनूर दि.15-बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी ( दि .१५ ) सकाळी १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा पोलिसांनी जलदगतीने तपास केला असून मुलाचा खून बापानेच केल्याचे समोर आले आहे.
बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी ( दि .१५ ) सकाळी १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आपल्या मुलाचा खून केलेल्या बापाला पकडले.
रमेश वाघामारे असे त्या आरोपीचे नाव असून त्याने तीन विवाह केले आहेत पहिली सोडून गेली ,दुसरी ने आत्महत्या केली आणि तिसरी सोबत तो बीड मध्ये राहत होता. आपल्या पहिल्या पत्नी चा मुलगा आज्जी आजोबा सोबत खडकी घाट येथे राहत असताना जमिनीच्या वादा वरून खून केला असल्याचे माहिती समोर येत आहे.
राकेश उमेश वाघमारे ( वय -१३ ) या तरुणाचा बुधवारी सकाळी एका पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.राकेशचा खून आहे की घातपात हे पोलीस तपासातून समोर येणार असतानाच पोलिसांना त्या मुलाचा बाप पहाटेच गाव सोडून गेल्याची खबर मिळाल्यानंतर नेकनूर पोलीस अमोल नवले , श्री खांडेकर , श्री.घोलप ,डोंगरे श्री.चव्हाण यांनी तपस चक्रे फिरवत आरोपीला पाटोदा येथील पोलिसांच्या मदतीने पकडत बेड्या ठोकल्या आहेत.
बातमी शेअर करा