Advertisement

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

प्रजापत्र | Saturday, 11/09/2021
बातमी शेअर करा

बीड : कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ही खळबळजनक घटना बीड शहरातील मासूम कॉलनीत शनिवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजता घडली.  

 

शेख मल्लिका शेख याकूब (वय ३८) असे मयत महिलेचे नाव आहे. मल्लिका आणि शेख याकूब शेख खुदबुद्दीन (वय ४२) यांचा आठ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहे. परंतु पती शेख याकूब हा सतत मलिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांचा शनिवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. वादातून याकूबने मलिकाचा गळा आवळला आणि नंतर उशी तोंडावर दाबून तिचा खून केला. यावेळी त्यांची मुले घराबाहेर खेळत होती. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि. विश्वास पाटील, पोह. गणेश जगताप आदींनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पतीचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी कुठेही न जाता थेट पेठ बीड पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे जावून पोलीसाना पत्नीचा खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर पेठबीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

Advertisement