Advertisement

पुरातील पाण्यात दुचाकी गेली वाहून 

प्रजापत्र | Tuesday, 07/09/2021
बातमी शेअर करा

 नेकनूर दि . ७ (वार्ताहर )- कपिलधार येथे आज फिरण्यासाठी आलेले बीड येथील दोन  तरुण दुचाकी वर आले होते यावेळी  पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकी चालकांनी त्यामधुन आपली मोटरसायकल घातल्याने सदरील दुचाकी वाहून गेली व त्यासोबतच गाडीवरील (ओंकार विभुते वय १७ रा. माळीवेस,बीड)    व (यशराज कुडके वय १७ रा. कबाड गल्ली बीड ) हे दोघे जण होते त्यातील ओंकार विभूते यास वाचवण्यास तेथील ग्रामस्थांना यश आले असून यशराज कुडके अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे

Advertisement

Advertisement