Advertisement

बंधाऱ्यात बुडून तिघे बेपत्ता, एकाचा सापडला मृतदेह

प्रजापत्र | Monday, 06/09/2021
बातमी शेअर करा

 

 

वडवणी-  तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीला मोठा पूर आला होता पिंपरखेड गावाच्या अगदी जवळ जिल्हा परिषद शाळेच्या जवळ खडकावरचा बंधारा म्हणून ओळखला जातो नदी दुथडी भरून वाहत होती आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अजय मधुकर खळगे (वय २३ वर्षं) हा मुलगा बंधाऱ्याजवळ गेला असता अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे तो बंधाऱ्यात बुडाला त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मधुकर रोहिदास खळगे (वय ५५ वर्षं) हे ही बंधाऱ्यात गेले असता ते पण बुडाले जवळच भाचा अजय उजगरे (वय २१ वर्षं) हा त्यांना वाचण्यासाठी बंधाऱ्यात उडी मारली तो पण या पुराच्या पाण्यात वाहून गेला यात मधुकर रोहिदास खळगे यांचा मृतदेह सापडला तर बाकीचे दोघेजण बेपत्ता आहेत त्यांचे शोध कार्य सुरू असून एकंदरच या घटनेमुळे पिंपरखेड गावावर दुखाचे सावट पसरले आहे.

 

 

Advertisement

Advertisement