अंबाजोगाईः करुणा शर्मांच्या गाडीत सापडलेल्या पिस्तुल प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मांच्या चालकाला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने ही १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी करुणा शर्मा परळित आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वाहनातून पोलीसांनी पिस्तूल जप्त केले होते. या प्रकरणात पोलिसांनी शर्मांच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल केला होता. त्याला आज अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बातमी शेअर करा