Advertisement

करुणा शर्मांना न्यायालयीन कोठडी

प्रजापत्र | Monday, 06/09/2021
बातमी शेअर करा

 

अंबाजोगाईः प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल गुन्हयात सोमवारी अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. रविवारी त्यांच्यावर परळीतील एका व्यक्तीवर चाकु हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात आता अंबाजोगाई न्यायालयाने शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement