Advertisement

'त्या' पिस्तूल प्रकरणात करुणा शर्मांच्या वाहन चालकावर गुन्हा

प्रजापत्र | Monday, 06/09/2021
बातमी शेअर करा

 बीड : परळीत रविवारी करुणा शर्मा यांच्या गाडीत सापडलेल्या पिस्तूलच्या प्रकरणात अखेर पोलिसांनी करुणा शर्मा ज्या वाहनातून आल्या होत्या त्या वाहनाच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करीत रविवारी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या वाहनात पिस्तूल आढळले होते. करून शर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या वाहनांची तपासणी करताना हे पिस्तूल सापडल्याचे पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी सांगितले. या प्रकरणात शर्मा ज्या गाडीतून आल्या त्या गाडीची डिक्की  कोणीतरी उघडून त्यात काहीतरी ठेवत असल्याचा व्हिडीओ काल समोर आला होता , त्याची चौकशी सुरु असून पोलिसांनी सध्या केवळ गाडीच्या चालकावरच शस्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सांगितले. करुणा शर्मा यांच्यावर यापूर्वीच प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जाती जमाती कात्याचार प्रतिबंणधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement