Advertisement

   दोन गटात हाणामारी एक ठार, दोन गंभीर

प्रजापत्र | Tuesday, 31/08/2021
बातमी शेअर करा

  
अंबाजोगाई- अंबाजोगाई येथील रायगड नगर भागात राहणाऱ्या रवी धोत्रे (वय ३२ वर्ष) या युवकाचा पोटात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.३१) दुपारी १२.३० वाजता घडली असून सदरील घटना मयत युवकाच्या घराजवळ घडली असल्याची माहिती प्राप्त होत असून डुकरांच्या शिकारी वरून निर्माण झालेल्या पैश्याच्या वादातून घडली असल्याचे समजते शिकलकीर समाजाच्या आठ जणांनी रवी धोत्रे यांच्यावर एकत्र येऊन त्यांच्या घराजवळ हल्ला चढवला आहे याहल्ल्यात एक जण जागीच ठार तर दोनजन गंभीर रित्या जखमी झाल्याचे समजते जखमींना तात्काळ स्वारातीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खुनाच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस  करत आहेत . 

 

 

 

Advertisement

Advertisement