Advertisement

विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू

प्रजापत्र | Monday, 30/08/2021
बातमी शेअर करा

 

नेकनूर - विवाहित असलेल्या २८ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मृत्यूबाबत मयत महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांना दोषी ठरवत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना तांदळ्याचीवाडी येथे घडली असून पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात इनकॅमेरा करून घेतले.

 

 

संगीता हनुमंत तांदळे (वय २८) या महिलेचा मृत्यू झाला. सदरील महिलेच्या मृत्यूबाबत महिलेच्या माहेरच्या लोकांनी संशय व्यक्त करत आमच्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप केला. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, पीएसआय विलास जाधव, दीपक खांडेकर, पवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व महिलेचा मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई रुग्णालयात पाठवून दिला होता. त्या ठिकाणी इनकॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास शेख हे करत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement