Advertisement

सतर्क नागरिकांमुळे वाचला दारुड्याकडील एक लाखाचा मुद्देमाल

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

केज-खिशातील पैसे काढून घेणे, पाकीटमारी, चोऱ्या अशा घटना वारंवार घडत असतात. त्यातच व्यसनी व्यक्तींच्या खिशातील पैसे, अंगावरील दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू काढून घेण्याचे अनेक प्रकार सर्रास घडतात. मात्र याला अपवाद घडला असून केज तालुक्यातील साळेगाव येथे एक व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे व त्याच्याजवळ नगदी ६२ हजार रुपये मोबाईल व अंगठी असल्याचे काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्याने  त्याच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व सर्व मुद्देमाल त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केला. 
            

  तालुक्यातील साळेगाव येथे दि.२८ ऑगस्ट शनिवार रोजी प्रल्हाद गडदे (रा.गदळेवाडी ता.अंबाजोगाई) हा इसम साळेगाव येथे बस स्टँडजवळ दारू पिऊन नशेत तर्रर्र होऊन पडला होते. त्यांच्याजवळ नदी ६२ हजार रुपये ५ ग्रॅम वजनाची सुमारे २३ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व सुमारे १५ हजार रुपयाच मोबाईल मोबाईल होता. मात्र ते नशेत तर्रर्र असल्यामुळे त्यांच्या जवळील ऐवज सुरक्षित राहू शकत नव्हता. जर ते पुढे गेले असते तर निश्चित त्यांच्याकडील हा ऐवज लुटला गेला असता; याची कल्पना साळेगाव येथील ओमप्रकाश मुळे, शेख आतिक व शरद इंगळे यांना येताच त्यांनी प्रल्हाद गडदे यांच्या कडील पैसे, अंगठी व मोबाईल हा सर्व  हे ऐवज ताब्यात घेतला. त्यानंतर त्याच्या मोबाईल फोनवरून प्रल्हाद गडदे यांचा मुलगा जय गडदे यांच्याशी संपर्क साधला. जय गडदे त्यांना साळेगाव येथे बोलावून पैसे आणि सर्व वस्तू त्याच्या ताब्यात दिल्या. ओमप्रकाश मुळे त्यांचे सहकारी अतिक शेख व शरद इंगळे यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement