Advertisement

गावठी पिस्टल बाळगणार्‍याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रजापत्र | Sunday, 29/08/2021
बातमी शेअर करा

 

बीड दि. २९ (प्रतिनिधी )- विनापरवानागा गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्‍या एका २२ वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३/२५नुसार गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रॉयल ज्यूस बार, अ‍ॅक्सीस बँकेसमोर अक्षय लाड नावाचा युवक उभा असून विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल स्वत:जवळ बाळगून दहशत पसरवत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांनी त्याठिकाणी आपली टीम पाठवत गावठी पिस्टलसह युवकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता अक्षय व्यंकटराव  लाड (वय २२, रा. माळीवेस, कोतवाल गल्ली), असे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे गावठी पिस्टलसह मॅगझीनमध्ये एक जिवंत राऊंड मिळून आला. या प्रकरणी तरुणावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.

Advertisement

Advertisement