Advertisement

रस्ता दुरुस्तीसाठी सरपंचासह ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 24/08/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई दि.२३ (वार्ताहर)- रस्त्यावरील वाहतुकीचा फुल पावसाने वाहून गेल्यामुळे रोडवर पाणी साचले असून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा यासाठी पोळाचीवाडी येथील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

 

 तालुक्यातील पोळाचीवडी येथून राज्य महामार्ग गेवराई ते चकलांबा गेला आहे सदर मार्ग पोळाचीवाडी येथून जात आहे परंतु रोडवरील वाहतुकीसाठी असणारा पूल पावसाने वाहुन गेल्यामुळे त्याजागी मोठं मोठे खड्डे पडले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे त्यामूळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी बांधकाम विभागाला या संदर्भात निवेदन दिले आहे परंतु याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे दि.२४ मंगळवार रोजी पोळाचीवाडी सरपंचा सह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय गेवराई येथे अर्ध नग्न आंदोलन करून प्रशासनाविरोधात नारेबाजी करून पुल लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement