Advertisement

'मला आपली माणसं वाचायची आहेत,त्यामुळे सांगतो तितकेच बोला'

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.२२ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळ्यात जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करावी लागल्यानंतर या घोटाळ्याचे चटके आता अनेकांना बसणार हे पष्ट आहे मात्र या चटक्यांनी 'आपल्या जवळच्यांचे हात होरपळू नयेत यासाठी नरेगा विभागातील काही अधिकारी पुढे सरसावले आहेत ज्या ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यांना बोवुन वरिष्ठांसमोर आम्ही सांगतो तितकेच बोला. प्रत्येकाने वेगळे सांगू नका अशी भावनिक साथ त्यांना घातली आहे.

बीड जिल्ह्यातील नरेगा घोटाळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर या प्रकरणात जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना बदलीला सामोरे जावे लागले त्यामुळे आता नवीन येणारे अधिकारी फार कोणाला वाचवायचा प्रयत्न राहणार नाहीत असे अपेक्षिले जात आहे. त्यामुळेच यात ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत असे अश्यांचे धाबे दणाणले आहेत.

मनरेगाच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात शेकडो ग्रामसेवक  ग्रामरोजगारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नजर आज आता सध्या नोटिसांची खुलासे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे खुलासे देताना अनेकांनी आम्ही कायम तुमच्या ऐकायची सर्व प्रोटॉकल पूर्ण करायचे आणि आता सारे खापर आमच्या डोक्यावर का? असा सवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारल्याची माहिती आहे. 'जर आम्हीच गुंतणार असतो तर आम्ही सुद्धा सारा काही खरं खरं सांगू कोणाच्या सांगण्यावरून कामी केली, त्याचे लाभार्थी कोण कोण? हेसुद्धा सांगू' अशी भूमिका घेतल्याची माहिती आहे. खालच्या कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत नरेगा समन्वय ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एका अधिकाऱ्यानेच आता कलेक्टर सीईओ समोर मोजकेच बोला आम्ही सांगतो तेच सांगा आम्हाला आपली माणसं वाचायची आहेत.'अशी भूमिका घेत भावनिक करणे सुरू केली असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

Advertisement

Advertisement