Advertisement

बीड जिल्ह्यात २४ चोरीच्या मोटार सायकल आरोपीकडुन जप्त

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड दि.२२ – दिनांक २५/०२/२०२१ रोजी फिर्यादी बापु साहेब आश्रुबा झोडगे रा. सुकळी ता. धारूर यांनी त्यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.४४-पी- ४९७६ हि इरिगेशन कॉलनीचे जवळ औरंगपुररोडवरुन चोरी गेल्याबाबत पोलीस ठाणे सिरसाळा येथे तक्रार दिली होती. त्यावरुन गु.र.न. २७/२०२१ कलम ३७९ भा.दं.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याचा तपास पोहेकी १९९६ ए. आर. मिसाळ हे करीत आहेत.

             सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी सय्यद अमीर सय्यद नोमान वय ३० वर्ष, रा. पेठ मोहल्ला परळी वै. ता. परळी, अशोक रमेश गायकवाड वय २० वर्ष, रा. सिरसाळा ता. परळी यांना ताब्यात घेवून विचारपुस करुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल क्रमांक एम.एच.४४-पी-४९७६ व इतर २३ चोरीच्या मोटारसायकल मिळुन आल्या आहेत. इतर चोरीच्या मोटारसायकल परळी शहर, माजलगाव शहर, दिंद्रुड, वडवणी, पथरी, गंगाखेड, उदगीर याठिकाणावरुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील दोन्ही आरोपींना अटक करून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. परळी यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालय यांनी सदर आरोपींना दिनांक २४/०८/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे.

 

 

 

   सदर आरोपींकडून याव्यतिरीक्त आणखी चोरीच्या मोटारसायकल व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरीच्या मोटारसायकलचे चेसीस नंबर व इंजिन नंबरची यादी सोबत जोडली आहे. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांची मोटारसायकल नमुद यादीमध्ये आहे. त्यांनी मोटारसायकलचे कागदपत्रासह पोलीस ठाणे सिरसाळा येथे संपर्क साधावा. वरील कामगिरी मा. श्री आर. राजा. पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये उपविभाग अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक पी.बी. एकशिंगे पोलीस ठाणे सिरसाळा, पोउपनि एम. जे. विघ्ने, पोडेको २१९६ मिसाळ, पोना/ १७५३ अंकुश ढके, पोना २८६६ जेटेबाड, पोशि/ १८१६ सय्यद, पोशि १५९२ देशमुख यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement