बीड : बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बृहणमुंबई महानगर पालिकेत सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे जातपडताळणी समितीचे अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्हा परिषदेत एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अजित कुंभार यांची ओळख होती. नियमांवर बोट ठेवणारा अधिकारी म्हणून ओळख असल्याने त्यांचे जिल्हापरिषदेत कोणाशी फारसे पटले नाही. अनेक दिवसांपासून त्यांच्या बदलीच्या चर्चा अधूनमधून होत होत्या. कुंभार यांचे राज्याच्या वरिष्ठ प्रशासकीय वर्तुळात चांगले स्थान आहे. आता त्यांना बृहणमुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यांच्या काळात नरेगातील अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली. तसेच नरेगातील मनमानीला त्यांनी बर्यापैकी ब्रेक लावला होता.
अजित कुंभार यांच्या जागी आता अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अजित पवार हे येत आहेत. अजित पवार यांच्याकडे सध्या पुणे जिल्हा जात पडताळणी समितीचा कारभार होता.
बातमी शेअर करा