माजलगाव दि.१९ (वार्ताहार) -माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लऊळ येथील एका मजुराचे काल रात्री दोन चोरट्याने घर फोडून घरातील सोन्या चांदीसह नगदी असा एकूण अकरा हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.
शेषनारायण व्यंकटी शेंडगे रा.लऊळ ता.माजलगाव यांच्या घरी काल रात्री अज्ञात दोन चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करत रॅकमध्ये ठेवलेले सोन्याचे दोन ग्रॅमचे मणी व पेटीत ठेवलेले तीन हजार रूपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार आयतवार हे करत आहेत.
हेही वाचा...
शाळा आणि महाविद्यालय उघडणार?
http://prajapatra.com/2917
बातमी शेअर करा