केज - तालुक्यातील नाव्होली येथे एका विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक जाचास कंटाळून राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या भावाच्या फिर्यादी वरून तिचा नवरा, सासरा आणि ल दिराच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती अशी की, पिसेगाव येथील सायसराव लांडगे यांची मुलगी कल्पना हिचे लग्न सन २०१४ मध्ये नाव्होली तालुका केज येथील दत्तात्रय उर्फ भुजंग झाडे याच्या सोबत झाले होते. तिला साडेतीन वर्षे वयाचा वैष्णव हा मुलगा व तीन महिन्याची लहान मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
कल्पना हिला तिच्या सासरचे लोक शेतात बोअर घेण्यासाठी व मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सतत मागणी करीत असत त्यातून तिला शारीरिक व मानसिक छळ देऊन मारहाणीचे देखील प्रकार घडलेले होते. या सर्व त्रासाला कंटाळून कल्पना हिने दिनांक १८ रोजी मंगळवारी पहाटे २:०० वा. च्या सुमारास घरातील लोखंडी अडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत दि. १८ ऑगस्ट रोजी मयत कल्पना हिचा भाऊ अंकुश सायसराव लांडगे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात तिचा नवरा दत्तात्रेय उर्फ भुजंग माणिक झाडे; सासरा माणिक विठ्ठल झाडे व दिर गोरख उर्फ पोपट माणिक झाडे या तिघांच्या विरुद्ध गु.र.नं. ३९६/२०२१ भा.दं.वि. ३०६, ४९८(अ), ३२३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा...
दोन तंत्रज्ञांची आरोग्य विभागातून हकालपट्टी
http://prajapatra.com/2910