Advertisement

आ.क्षीरसागरांच्या वाढदिवसानिमित्त वल्लभ चिरकेंचा नेत्रदानाचा संकल्प

प्रजापत्र | Thursday, 27/08/2020
बातमी शेअर करा

बीड-येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि.२७) त्यांचे समर्थक असलेले वल्लभ चिरके यांनी जिल्हा रुग्णालयात नेत्रदानाचा संकल्प केला.आपल्या लाडक्या नेतृत्वाला दिर्घआयुष्य लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.   
                              गुरुवारी (दि.२७) बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व समर्थकांना सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्या अनुषंगाने वल्लभ चिरके यांनी नेत्रदानाचा संकल्प करून समाजात एक आदर्श निर्माण केला.यावेळी चिरके म्हणाले की,अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे.परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. जन्मानंतर त्यांना अंधत्व येते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत. ते या सृष्टीसौंदर्याला मुकतात. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील,आणि त्यामुळेच मी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले. 

 


 

Advertisement

Advertisement