परळी- संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानअंतर्गत दादाहारी वडगाव जिल्हा परिषद सर्कलमधून नंदनज ग्रामपंचायतने ५० हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावित इतर ग्रामपंचायत पुढे आदर्श निर्माण केला.नंदनज ग्रामपंचायतच्या वतीने जो अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे तो अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन भाजप नेते राजेश गित्ते यांनी केले.यावेळी सरपंच अनिल गुट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सभागृहात नंदनज ग्रामपंचायतला सोमवारी (दि.२४) प्रथम पारितोषिक देण्यात आले.यावेळी सरपंच अनिल गुट्टे यांचा भाजप नेते राजेश गित्ते यांनी सत्कार केला.गित्ते म्हणाले,नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात स्वच्छता अभियानावर भर दिला जात आहे.आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून ती सामाजिक आणि आरोग्यदृट्या जनतेसाठी घातक आहे. नंदनज ग्रामपंचायतने संपूर्ण गावात स्वच्छतेचा जो अभिनव उपक्रम राबविला आहे तो इतर ग्रामपंचातसाठी प्रेरणास्रोत आहे.ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेवरजो भर देण्यात येत आहे त्यामुळे साथीचे रोग उध्दभवणार नाहीत.सरपंच अनिल गुट्टे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेले कार्य इतर ग्रामपंचायतसाठी खऱ्या अर्थाने अनुकरणीय असल्याचे गित्ते म्हणाले.
बातमी शेअर करा