Advertisement

६५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या 

प्रजापत्र | Sunday, 08/08/2021
बातमी शेअर करा

 

 
केज दि.८ –  तालुक्यातील गांजी शिवारात एका ६५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून युसुफ वडगाव पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गांजी येथील उत्तम बाबुराव जाधव यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला मोतीराम चंद्रभान पटने यांनी दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१५ च्या सुमारास आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सदरील व्यक्तीला दारूचे व्यसन होते यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बिट अंमलदार परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मयताच्या पुतण्याच्या खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिंदे हे करत आहेत.

 

 

हेही वाचा... 
कोरोनाचा आलेख पुन्हा वाढला 
 http://prajapatra.com/2848

Advertisement

Advertisement