Advertisement

सासऱ्याने फोडले सुनेचे डोके 

प्रजापत्र | Thursday, 05/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 केज दि.५ – तालुक्यातील विडा येथे घराच्या कारणावरून सासऱ्याने सुनेच्या डोक्यात दगड घालून डोके फोडल्याची घटना घडली असून सुनेच्या फिर्यादीवरून सासऱ्यावर केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

               विडा येथील रहिवासी सुवर्णा या पती भारत माने यांच्यासह सासू सासऱ्या पासून विभक्त राहत आहेत. दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. ते दोघे त्यांच्या सासर घरी गेले असता वडिलोपार्जित घरी राहण्याच्या कारणा वरून सून सुवर्णा व पती भारत माने यांचे सासरा खंडू माने यांच्यात भांडण झाले. खंडू माने यांनी त्यांची सून सुवर्णा हिस शिवीगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच सासू बबिता माने हिने पण मारहाण केली. या प्रकरणी सून सुवर्णा माने हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला सासरा खंडू माने व सासू बबीता माने यांच्या विरुद्ध भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

 

 

हेही वाचा... 
  १५ ऑगस्टपर्यंत पीक विम्याची रक्कम द्या,अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालू         
http://prajapatra.com/2828

 

Advertisement

Advertisement