Advertisement

 जावयाचा सासरवाडीत राडा

प्रजापत्र | Saturday, 31/07/2021
बातमी शेअर करा

 

 

 

केज  दि.३१ – माहेरी असलेल्या पत्नीस सासूने पाठवण्यास नकार दिल्याच्या कारणातून सासू, पत्नी व मेव्हण्याला शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी एकावर केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           तालुक्यातील शिरूर घाट येथील रामचंद्र माणिक सांगळे हा दि.३०/०७/२०२१ रोजी रात्री ११ वाजता फिर्यादी अभिषेक अश्रुबा बांगर रा. मुंडेवाडी यांच्या घरासमोर गेला व मोठमोठ्याने ओरडून व शिविगाळ करत घराच्या दरवाज्यावर लाथा मारत माहेरी आलेल्या पत्नीला मुलाबाळसह तू आत्ताच माझ्याबरोबर चल असे म्हणाला.परंतु फिर्यादीच्या आईने मी मुलीस आत्ताच पाठवणार नाही असे म्हणताच आरोपीने फिर्यादीचे आईस चापटाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी फिर्यादी हा सोडवण्यास गेला असता त्यास लाथाबुक्क्याने मारहाण करून डाव्या हाताच्या दंडास व उजव्या बाजूच्या छातीवर चावुन दुखापत केली.तसेच फिर्यादीच्या  बहिणीस व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.
            सदरील प्रकरणी रामचंद्र माणिक सांगळे विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ह.श्री. ढाकणे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement