अशोक शिंदे
नेकनूर-येथून जवळच असलेल्या कळसंबर शिवारामध्ये एका २६वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
कळसंबर येथील सुवर्णा जीवन तांगडे (वय-२६) असे त्या विवाहितेचे नाव असून २८ जुलै पासून सुवर्णा या बेपत्ता होत्या.त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाही.२९ जुलै (आज) सकाळी पहाटे कळसंबर शिवारातील एका विहिरीत सुवर्णा तांगडेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी एपीआय लक्ष्मण केंद्रे,दीपक खांडेकर,अमोल नवले आदी पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेह नेकनूरच्या कुटीर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. दरम्यान विवाहितेने आत्महत्या केली की घातपात झाला हे पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.
बातमी शेअर करा