Advertisement

पहिल्याच दिवशी लालपरीच्या ३८ फेऱ्या;आंतरजिल्हा प्रवासाला उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रजापत्र | Thursday, 20/08/2020
बातमी शेअर करा

बीड दि.२० (प्रतिनिधी)-राज्य सरकारच्या वतीने गुरुवारपासून आंतरजिल्हा बसला परवानगी मिळाली असून बीडच्या आगारातून पहिल्याच दिवशी लालपरीच्या ३८ फेऱ्या झाल्या आहेत. आंतरजिल्हा प्रवासाला प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.
                          लॉकडाऊनमध्ये एसटीची अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील वाहतूकीला परवानगी मिळाली.जवळपास एक महिना जिल्हांतर्गत बसच्या फेऱ्या सुरु होत्या.त्यानंतर राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत गुरुवारपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली असल्याने बीडच्या आगारातून सायंकाळी पाच पर्यंत ३८ फेऱ्या झाल्या होत्या.औरंगाबादलाही पाच महिन्यानंतर बीडच्या आगारातून बस धावली असून दिवसभरात ४०० पेक्षा अधिक प्रवाशांनी वाहतुकीचा लाभ घेतला असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

 

Advertisement

Advertisement