Advertisement

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Wednesday, 07/07/2021
बातमी शेअर करा

 केज दि.७ - एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सावळेश्वर ( पैठण ) येथे ७ जुलै रोजी घडली. नानासाहेब बाबासाहेब दौंड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. 

        सावळेश्वर ( पैठण ) येथील शेतकरी नानासाहेब बाबासाहेब दौंड ( वय ३५) हे ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतातून जनावरांचे शेण काढून येतो असे सांगून घरातून गेले होते. त्यांनी शेतात जाऊन त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. नानासाहेब दौंड यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, जमादार राहुल भोसले, पोलीस नाईक पांडुरंग वाले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत शेतकऱ्याचे भाऊ शामसुंदर बाबासाहेब दौंड यांनी दिलेल्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement