Advertisement

कोरोना बाधितांचा आकडा  वाढला 

प्रजापत्र | Tuesday, 06/07/2021
बातमी शेअर करा

 

 

  बीड- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (दि.६) कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सोमवारी बीड जिल्ह्यात बाधितांची संख्या १०० वर आली होती आता मात्र मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज आरोग्य विभागाच्या अहवालात १३२ पॉझिटिव्ह आले असून यावेळी ३०८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

 

पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ६,आष्टी ३८, बीड १९,धारूर २,गेवराई २४,केज ८,माजलगाव ९,परळी ३,पाटोदा ८ शिरूर ९ तर वडवणीत सहा रुग्ण आढळून आले आहे.

 

 

Advertisement

Advertisement