Advertisement

गुंगीचे औषध देऊन मेव्हणीवर बलात्कार

प्रजापत्र | Saturday, 03/07/2021
बातमी शेअर करा

 

 परळी-एका २९ वर्षीय विवाहित मेव्हणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला.नंतर याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत तो व्हायरल करण्याची धमकी देेत दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून परळीच्या संभाजी नगर पोलीस ठाण्यात मेव्हणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

 

       पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,फिर्यादी पिडित महिला व आरोपी हे नात्याने मेव्हणा-मेव्हणी आहेत.दोन वर्षांपूर्वी आरोपी राहुल सुधाकर गुत्तेदार (रा.रा.सोन्वत ता.कमलापुर जि.गुलबर्गा) याने पीडिता घरी एकटी असताना तिला ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले.नंतर तिच्यावर बलात्कार करत तो व्हिडिओ रेकॉर्ड केला.नंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी राहुल गुत्तेदार दोन वर्षांपासून पीडितेवर बलात्कार करत होता.याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून परळीच्या संभाजी नगर पोलीस ठाण्यात मेव्हणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.मेंढके हे करीत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement