Advertisement

भानामतीच्या संशयावरून एका महिलेस घरात घुसून मारहाण

प्रजापत्र | Thursday, 01/07/2021
बातमी शेअर करा

 

प्रतिनिधी / केज  -तु आमच्यावर भानामती का करतेस असे म्हणत एका ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करीत लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. तर ४५ हजार रुपयांचे गळ्यातील गंठण तोडून घेतले. याप्रकरणी केज पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.  

          केज शहरातील गणेश नगर भागातील फिर्यादी फुलाबाई वणीदेव चौरे ( वय ३० ) ही महिला ३० जून रोजी रात्री १० वाजता तिच्या घरी असताना चंद्रकांत वळसे, छाया चंद्रकांत वळसे, ज्योती चंद्रकांत वळसे, स्वाती चंद्रकांत वळसे, सुप्रिया चंद्रकांत वळसे ( सर्व रा. गणेश नगर, केज ) हे सर्व जण संगनमत करून घरात घुसले. त्यांनी तू आमच्यावर भानामती का करतेस असे म्हणत शिवीगाळ करून फुलाबाई चौरे व त्यांच्या सासुस लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण तोडून घेत जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी फिर्याद फुलाबाई चौरे यांनी दिल्यावरून चंद्रकांत वळसे, छाया वळसे, ज्योती वळसे, स्वाती वळसे, सुप्रिया वळसे यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत. 

Advertisement

Advertisement