Advertisement

दिलासा! जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट 

प्रजापत्र | Sunday, 27/06/2021
बातमी शेअर करा

 

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असून रविवारी (दि.२७) आरोग्य विभागाच्या अहवालात ५२०० तापसण्यामध्ये १३१ पॉझिटिव्ह तर ५०६९ निगेटिव्ह आले आहेत.कोरोनाची घटती रुग्णसंख्या बीड जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे. आज पॉझिटिव्हिटी दर अडीच टक्क्यावर  आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे . 

           

 

  रविवारी पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ९,आष्टी ३३,बीड ३०,धारूर ७,गेवराई १७,केज ३,माजलगाव ३,परळी ४,पाटोदा १३,शिरूर ५ आणि वडवणीत सात रुग्ण आढळून आले आहेत.दरम्यान काही तालुक्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्ण संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement