Advertisement

शिवसेनेच्या दोन गटात तुंबळ राडा

प्रजापत्र | Thursday, 24/06/2021
बातमी शेअर करा

माजलगाव- दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अप्पासाहेब जाधव यांची निवड झाली होती या निवडीचा  शिवसेनेचे शहर प्रमुख पापा सोळंके यांनी निषेध नोंदवला होता. आज जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची मिरवणूक सुरु असताना सोळंके गटाकडून वंगण फेकण्याचा प्रयत्न झाला, तर जिल्हाप्रमुखांसह त्यांच्या निकटवर्तीयांनी पापा सोळंके यांना जबर मारहाण केली.

 

         

  माजलगाव शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची शिवसेनेच्या बीड जिल्हाध्यक्ष म्हणून दोन दिवसांपूर्वी निवड झाली या निवडीवरून स्थानिक शिवसेनेच्या गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली या निवडीचा निषेध म्हणून शहर प्रमुख पापा सोळंके यांनी शिवाजी चौक येथे अप्पासाहेब जाधव यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन छेडले नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव हे माजलगाव याठिकाणी आले असता त्याची मिरवणूक सुरु होती मिरवणुकीच्या दरम्यान पापा सोळंके आणि त्याच्या सोबत असलेल्या इतर शिवसैनिकांनी संभाजी चौक याठिकाणी वंगण घेऊन जात मिरवणुकीत फेकण्याचा प्रयत्न केला यावेळी जाधव गटाकडून पापा सोळंकेयांना  जबर मारहाण करण्यात आली.यामध्ये पापा सोळंके हे गंभीर मार लागला असल्याची माहिती आहे.घटनस्थळी तात्काळ पोलीस हजर झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा

https://youtu.be/n1T5xLmf5As

Advertisement

Advertisement