Advertisement

 अज्ञात वाहणाच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी

प्रजापत्र | Sunday, 20/06/2021
बातमी शेअर करा

 

 

 

गेवराई प्रतिनीधी- तालुक्यातील सावरगाव रोडवर साठेवाडी फाट्या जवळ (दि.२०) रविवारी दुपारी अज्ञात वाहणाने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली या आपघातात  दुचाकी वरील तीन जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.  

 

 कोळगाव कडुन गेवराईकडे जाणाऱ्या MH २३ AE ५२६८ दुचाकीस भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहणाने जोराची धडक दिली, घटनास्थळावरुन वाहन चालकाने पोबारा केला या आपघातात   जखमी शिरूर तालुक्यातील कान्होबाचीवाडी येथील जाधव कुटुंबियातील आहेत यामध्ये एक जण जखमी अवस्थतेत  जाग्यावर बेशुद्ध झाला तर दोघे जण जखमी झाले असून यामध्ये एका छोट्या मुलाचाही समावेश आहे.

 

 

 जखमींना सामाजिक कार्यकर्ते सुधाकर जाधवर व जयसिंग डोंगरे यांनी रुग्णवाहिका बोलवून त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे हलविण्यात आले आहे. रोजच आपघाताचे प्रमान वाढतच  चालले आहे त्यामुळे अपघात रोकण्यासाठी प्रशासणाने योग्य ती  उपाय योजना करणे गरजेचे आहे. 

Advertisement

Advertisement