Advertisement

मातावळी डोंगरात बिबट्या मृत गुजलेल्या अवस्थेत सापडला

प्रजापत्र | Friday, 18/06/2021
बातमी शेअर करा

 

आष्टी (प्रतिनिधी)  तालुक्यातील मातावळी परिसरातील डोंगरातील गावच्या गायरानातील झाडीत वयोवृद्ध बिबट मृत कूजलेल्या अवस्थेत  सापडल्याची घटना समोर आली आहे.शुक्रवार दि.१८ रोजी गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांने तो मृत कुजलेल्या अवस्थेत असलेला बिबट्याचे मुंडके(शिर),जबडा,हाडे आणि कातडी पाहली.याची माहिती आष्टी वनविभागाला दिल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी केली असता तो बिबट महिन्या भरापूर्वी मृत्यू झाला असल्याचे तसेच तो वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा दावा वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केला आहे.

 

 

           आष्टी तालुक्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने बिबट्याची संख्या जास्त आहे असे बोलले जात आहे.त्यात बीडसांगवी येथील महादेव दऱ्यातील मंदिराच्या कॅमेऱ्यात काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता.याची माहिती ह.भ.प.कल्याण महाराज कोल्हे यांनी दिली होती.मागील घटनेमुळे बिबट्याची दहशत संपुर्ण तालुक्यात आहे.मात्र, हे बिबटे माणसावर हल्ला करत नाहीत. मात्र बिबट्याचा वावर आहे. असे वनविभागाकडून बोलले जात आहे.त्यात हा प्रकार आष्टी-पाटोदा  सीमेवर असलेल्या मातावळी डोंगरात समोर आला आहे.अजूनही एका बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे असे वनविभागाकडून बोलले जात आहे.घटनास्थळी वनविभागाने धाव घेतली असून वरिष्ठ पशुवैद्यकीय डॉक्टर व टीमला पाचारण केले असून बिबट्याचा मृत्यू कश्याने झाला असेल ते वैद्यकीय अहवालातच समोर येईल अशी माहिती आष्टी तालुका वनविभाग अधिकारी श्याम शिरसाठ यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement